बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेटेंचा मृत्यू कसा झाला?, फडणवीसांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं 14 ऑगस्टला अपघाती निधन झालं. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. हा अपघातच आहे की घातपात याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांच्या कुटुंबानी व काही नेत्यांनी केली.

या प्रकरणासंबधी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. मेटे मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीसमोर ट्रेलरही होता. ट्रेलरने शेवटच्या लेन मधून चालावं हा नियम असतानाही तो ट्रेलर मधल्या लेनमध्ये होता. दरम्यान, मेटे यांच्या चालकाने एकनाथ कदमन यानी तिसऱ्या लेनमधून ट्रेलरला ओव्हरटेक केला. पण त्यानंतरही समोर दुसरे वाहन होते. या दोन्ही वाहनांमधून मार्ग काढण्याचा ड्रायव्हरने प्रयत्न केला. पण ड्रायव्हरचा अंदाज चुकला आणि मेटे ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला ट्रेलरची जोरात धडक बसली. त्यामुळे मेटे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर खरं काय ते काही समोर येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ड्रायव्हरच्या चुकीमुळेच मेटेंचा मृत्यु झाला, असाच अर्थ फडणवीसांच्या बोलण्याचा होताना दिसतोय. आता मेटेंच्या मृत्युबाबत नेमकं खरं काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं दिसून येतं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More