बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही डीआरएस गमावला तरीही विराट पंतवरच बिघडला

मुंबई | भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा कसोटी सामना चालू आहे. भारताचा पहिला डाव 364 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी सावध सुरूवात केली होती. मात्र भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या भेदक माऱ्याने सलग दोन चेंडूवर दोन गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.

सिराजने दोन गडी बाद केले मात्र त्याच्या षटकांमध्ये दोन डीआरएसही भारताला गमवावे लागले. याला सिराजच नाही विराट कोहलीही जबाबदार आहे. दोन डीआरएस हे ज्यो रूटवेळी घेण्यात आले. रूटची विकेट महत्त्वाची असली तरी अपील केल्यावर डीआरएस घेणं जोखमीचं असतं. विराट घाई करताना दिसतो आणि डीआरएस गमावून बसतो. आजच्या मॅचमध्ये त्याला पंत सांगत असतानाही त्याने डीआरएस घेतला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिराज विराटकडे डीआरएस घेण्यासाठी मागणी करत होता. त्यावेळी विराट हसतान दिसत आहे आणि शेवटच्या क्षणी तो घेतो त्यावेळी पंत त्याचा हात पकडत नकार कळवतो मात्र त्यानंतर कोहली त्याच्यावरच चिडलेला दिसत आहे.

दरम्यान, विराटचा पारा चढलेला दिसत आहे. मात्र त्याचा डीआरएस घेेण्याचा निर्णय नेहमीप्रमाणे अयशस्वी ठरला. भारताने याआधी घेतलेल्या 24 पैकी 21 डीआरएस गमावले आहेत. यावरून कोहली डीआरएसवर विचार न करता तड की फड निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात शेतजमीन खरेदी- विक्री करत असाल तर वाचा हे नियम , नियमात झाले मोठे बदल!

भारताला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू 28 व्या वर्षीच निवृत्त, आता खेळणार ‘या’ देशाकडून!

तुमच्यामुळे जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतून पळणारा नाही- उद्धव ठाकरे

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More