कर्ज घ्यायचंय! मग घरबसल्या ‘असा’ चेक करा सिबिल स्कोर

मुंबई | नोकरदार असो किंवा व्यवसायिक असो प्रत्येकजण अडचणीला बॅंकेकडून(Bank loan) कर्ज घेत असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणांंसाठी बॅंकेकडून लोन घेत असतो. अशाच कर्ज घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे.

कर्ज मिळवण्यासाठी काही नियम असतात. त्यातील पहिली स्टेप म्हणजे, कर्ज घेऊ इच्छित असणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर(CIBlL Score) चेक केला जातो. जर सिबिल स्कोर योग्य असेल, तरच कर्ज दिलं जातं. म्हणूनच ऐनवेळी तोंडावर पडण्यापेक्षा तुम्ही घरबसल्या मोबाईलवरही तुमचा सिबिल स्कोर चेक करू शकता.

यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून पेटीएम(Paytm) अॅप डाऊनलोड करावे लागेन. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप आधीच डाऊनलोड केले असेल तर ते तुम्ही अपडेट करून घ्या.

हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्च इंजिनमध्ये तुम्हाला फ्रि क्रेडिट सेवा सर्च करावी लागेन. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड नंबर, जन्मतारीख तसेच मोबाईल नंबर ही माहिती भरावी लागेन. ही माहिती सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर पाहता येईल.

दरम्यान, जेवढा तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तेवढं कर्ज मिळवणं सोप असतं. 700 पेक्षा जास्त स्कोर कर्ज घेण्यासाठी चांगला मानला जातो.

सुरूवातीला क्रेडिट कार्ड वापरत नसल्यामुळं किंवा आधी कोणतंही लोन न घेतल्यानं ग्राहकांचा सिबिल स्कोर शून्य असतो. अशावेळी बॅंक त्या व्यक्तीचे उत्पन्नाचे साधन, शैक्षणिक गुणवत्ता तपासून पाहते. तसेच बॅंकेच्या स्टेटमेंटचीही पडताळणी केली जाती. यानंतरच कर्ज द्यायचे की नाही हे बॅंक ठरवते.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More