ठाकरेंना आणखी एक धक्का; ‘या’ बड्या नेत्याची चौकशी होणार?
मुंबई | ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आमदार वैभव नाईक यांना एसीबीकडून मागील महिन्यातच नोटीस पाठवण्यात आली होती.
आमदार प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ज्या प्रमाणे दबाव टाकून शिंदे गटात प्रवेश करायला लावला. त्या प्रमाणे आम्ही या नोटीसीला भीक घालणार नाही, असं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.
आमदार वैभव नाईक यांना एसीबीकडून मागील महिन्यातच नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जी माहिती पाहिजे ते देऊन आम्ही सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ही नोटीस देण्यात आली असली तरी आम्ही पोलिसांना सर्व माहिती देऊन सहकार्य करणारच आहोत, मात्र भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज अर्ज छानणी असतानाही अशा प्रकारची नोटीस देऊन ग्रामपंचायत निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जात आहे, असंही नाईक म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.