“…तर बायकांनाही चार लग्न करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | प्रसिद्ध पटकथा लेखक, गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी सरकारविरोधात देखील काही वक्तव्य केली आहेत. ते त्यांच्या परखड बोलण्याने चर्चेत येत असतात. सध्या त्यांनी सिव्हिल कोडबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा होतीये.

एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी एका मुस्लिम लाॅ (Muslim Law) बद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मतानुसार जर मुस्लीम पतींना एकावेळी 4 लग्न करण्याचा अधिकार असेल तर, महिलांना देखील तसा अधिकार असायला हवा, असं मत त्यांनी मांडलं.

आपण स्त्री-पुरुष सामानतेबद्दल बोलतो मग ही समानता आहे का? अशा गोष्टींमुळे स्त्री-पुरुष समानता टिकते का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच भारतीय राज्य घटनेनुसार (Constitution of India) एकावेळी एकापेक्षा जास्त विवाह करणं कायद्याच्या विरोधात आहे, असं देखील ते म्हणाले.

सामान्य नागरी संहितेचा (General Civil Code) अर्थ असा नाही की सर्व समुुदायांसाठी एकच कायदा असावा. त्यापेक्षा त्याचा अर्थ स्त्री-पुरुष समानता असा होतो. त्यामुळे दोघांनादेखील समान हक्क मिळणं गरजेचं आहे. ते समान नागरी कायद्याला मानत असून त्यांच्या संपत्तीचे वाटप ते एकसमान करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्या देशाला सरकार (government) आणि सरकारला देश समजलं जात आहे. सरकार येतं आणि जातं मात्र देश कायम राहतो. सरकारला कोणी विरोध केला तर त्याला देशद्रोही (Traitor) ठरवलं जातं, असं असता कामा नये असंही ते म्हणालेत.

भारत देश हा लोकशाहीने(Democracy) चालतो. भारतातील लोकांची विचारधारा ही उदारमतवादी आहे. ती कट्टरवादी अजिबात नव्हती. आज अशाप्रकारच्या धर्मांधतेला प्रोत्साहन दिलं जात आहे. जी भारताची विचारधारा नाही आहे, असं देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या