बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही, एखाद्याला काही विशेष माहिती असेल तर…”

मुंबई | राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध अधिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नुकतंच सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफांच्या आरोपांनंतर कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

सोमवारी सोमय्या रेल्वेने कोल्हापूरला जात असताना कोल्हापूरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत त्यांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आलं. यानंतर राज्यभरात पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले गेले. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्यांना आपण ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांना आम्ही ओळखत नाही. या देशात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. जर एखाद्याकडे काही विशेष माहिती असेल तर त्याने ती माहिती पोलिसांना द्यावी.

महाराष्ट्रातील सरकार कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे सरकार आहे. राजकीय द्वेषापोटी कोणी चिखलफेक करायचं ठरवलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु तुम्ही कोणत्या स्तरावर जावून आरोप करताय हे महत्वाचं आहे, असं देखील राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

करुणा शर्मा यांचा जामीन मंजूर; तब्बल 16 दिवसांनी न्यायालयाकडून सुटका

“पाकिस्तानी सैैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंह सिद्धूंचा पंजाबी भाऊ”

“बाॅलिवूड चित्रपटांमध्ये माझा फक्त फर्निचरसारखा वापर केला”

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More