बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रसुती वेदना सुरू झाल्यात, बाळाला बघायला नक्की या’; प्राजक्ताची भन्नाट पोस्ट

मुंबई| मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभाशाली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जातं. मालिका, चित्रपट, निवेदन अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपलं कौशल्य दाखवत प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्राजक्ता माळी अनेकदा तिच्या पोस्टमुळे देखील चर्चेचा विषय ठरते.

प्राजक्ताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. प्रसुती वेदना सुरू झाल्यात, नवीन काहीतरी जन्माला घालतेय, असं प्राजक्ता या पोस्टमध्ये म्हणतेय.  त्यामुळे तिला या पोस्टमधून नक्की काय सांगायचं आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

उद्या काहीतरी जन्माला घालतेय. प्रसुती वेदना सुरू झाल्यात. बाळाला बघायला नक्की या, असं प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या अनोख्या कॅप्शनमुळे प्राजक्ताची ही भेट नक्की काय आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, या फोटोखाली हे माझ्या आयुष्यातील अतिशय महत्वाचं लाईव्ह सेशन आहे, चुकवू नका, असा कॅप्शन लिहिलं आहे. अनेक चाहत्यांनी देखील प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करून तिच्या लाईव्हला उत्सुकता दर्शवली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

थोडक्यात बातम्या –

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

‘राईचा पर्वत करण्याची गरज नाही’; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

“झोपडपट्टीमध्ये जाणारे बळी हे शिवसेनेचं पाप; महापालिका निवडणुकीत यांना कठोर शिक्षा द्या”

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More