बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीने 7 वाजता 29 मिनिटांनी का घेतली होती निवृत्ती?, समोर आलं ‘हे’ खास कारण!

मंबई | भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आजच्याच दिवशी एक वर्षाअगोदर 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. धोनीच्या या घोषणेमुळे सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. धोनीच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनानेही आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकत निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने 7 वाजून 29 मिनिटांनीच का निवृत्ती घेतली होती, त्याचं गुपित आता समोर आलं आहे.

2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्युझीलंडविरूद्ध धोनीने संयमी खेळी करत 72 चेंडूमध्ये 50 धावा चोपल्या होत्या. भारताचे सुरूवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर 240 धावांचा डोंगर गाठण्यासाठी धोनी खुप धडपड करत होता. परंतु चोरटी धाव घेण्याच्या नादात मार्टिन गुप्टीलच्या अफलातून थ्रोवर धोनी धावबाद झाला आणि भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. तोच सामना धोनीचा आंतरराष्ट्रीय करिअर मधला अखेरचा ठरला होता.

मागील वर्षीं 7 वाजून 29 मिनिटांनी म्हणजे आजच्याच दिवशी धोनीने निवृत्ती का घेतली होती? याचं कारण म्हणजे, भारतामध्ये सर्वात शेवटचा सुर्यांस्त गुजरातमधील ‘गुहार मोती या ठिकाणी होतो. त्यावेळी 15 ऑगस्ट 2020 रोजी सांयकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी तो सुर्यांस्त होणार होता. याच कारणामुळे धोनीनी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ स्वांतत्र्य दिनाच्या सुर्यास्ताची ठेवली होती.

ऑस्ट्रेलिया मध्ये होणारा टी-20 विश्वचषक कोरोना संकटामुळे स्थगित करण्यात आला. या स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं निवड समितीने सांगितलं होतं. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने क्रिकेटला कायमचं अलविदा केलेलं नाही. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघातर्फे खेळत आहे.

थोडक्यात बातम्या-

लग्नाच्या आठच दिवसानंतर नववधूने सासरच्यांना लुटलं अन्…

तिसरी लाट भंयकर काळजी घ्या, सरकार तुमच्यासोबत- नितीन राऊत

लग्न पार पडताच नवऱ्याचा हात लावून घेण्यास नवरीचा नकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

“…तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल”; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

…म्हणून पठ्ठ्यानं टी-शर्टवरवरच छापलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, पाहा फोटो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More