गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार?

मुंबई | अगदी कमी कालावधीत प्रसिध्द झालेली गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. अनेकदा तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रचंड राडा आणि गर्दी होते. अशातच गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर बंदी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे गौतमी पाटील राजकारणात (politics) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

नुकताच गौतमीनं साम टिव्हीशी संवाद साधलाआहे. यावेळी तुझ्या कार्यक्रमावर बंदी (Ban) घातली जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, यावर काय सांगशील? पूर्वीपेक्षा सध्याचे कार्यक्रम चांगले होत आहेत. यापूर्वी मी काही चुका केल्या, त्या मी मान्य केल्या आहेत. त्यात सुधार पण केला आहे. त्यामुळे बंदी आणण्याचं कारण नाही असं उत्तर तिनं दिलं आहे.

सध्या गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हणलं जात आहे, त्यावर काय सांगशील? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. मला राजकारणात अजिबात आवड नाही. माझं जे काम सध्या सुरु आहे तेच मी सुरु ठेवणार आहे. इतर कोणतीही गोष्ट मी करणार नाही. राजकारण पडणार नाही असं म्हणत गौतमीनं दोन्ही हात देखील जोडले.

दरम्यान, गौतमी पाटील ही मूळची सिंदखेडा(Sindkheda) जिल्ह्यातील आहे. घरच्या परिस्थितीमुळं तिनं शिक्षण अर्धवट सोडलं आणि डान्सला सुरुवात केली. सोशल मिडियामुळं (Social media) हळूहळू गौतमीला फेम मिळत गेला. तसेच पूर्वी एका कार्यक्रमासाठी 500 रुपये मानधन गौतमी घेत होती. सध्या तिच्या एका कार्यक्रमाचं मानधन 10,0000 इतकं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More