बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवायचा डाव होता”

यवतमाळ | त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेनंतर अमरावतीतही मोठा हिंसाचार (Amravati Violence) पाहायला मिळाला. अमरावती हिंसाचार घटनेनंतर राज्यभर तणावपूर्ण वातावरण होतं. अमरावती येथील हिंसाचाराच्या घटनेवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीकेची झोड उठवली आहे. काही लोक अमरावती शहरात आतंक करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

देशात जातीय दंगली घडवल्या जात आहेत. दोन्ही कट्टरपंथी हे चांगले मित्र असतात आणि आपल्याला येडं बनवतात, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. आपल्या देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होतं, सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचा डाव होता, असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी कोणत्याही पक्षाचं नाव न घेता केला आहे.

काही लोक अमरावती शहरात आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लिम लोक मंदिराचं रक्षण करत होते, तर काही हिंदु लोक मशीदींचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे, माझा धर्म आणि माझी जात हाच माझा तिरंगा असल्याचंही यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या आहेत.

अमरावतीत 12 तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या. त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केलं. फेसबुक लाईव्ह खालच्या कमेंट वाचल्या आणि आपल्या देशात काय चाललं आहे असा प्रश्न पडला असल्याचं ठाकूर म्हणाल्या तर जय श्रीराम म्हटलं की संपलं का संविधान असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोले यांनी गडकरींविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत ‘ही’ माहिती आली समोर

परळीच्या वैद्यनाथ मंदिराला बाॅम्बने उडवण्याच्या धमकीनंतर धनंजय मुंडे म्हणतात…

“50 लाख रुपये द्या नाहीतर परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आरडीएक्सनं उडवेल”

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More