मद्यप्रेमींसाठी खुशखबर; आता ऑफीसच्या आवारात करू शकता ड्रिंक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मद्यप्रेमींसाठी (Alcoholic) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऑफीसमध्ये कामाचा लोड आला की आता तुम्ही ऑफीसच्या आवारात जाऊन ड्रिंक करु शकता.

लवकरच नोएडातील आयटीकंपनीच्या (IT) आवारात बार सुरु करण्यात येणार आहेत. नोएडा प्राधिकरणाने नुकताच झालेल्या बैठकीत हा निर्णय दिला आहे. बऱ्याच दिवसांपासून आयटी कंपन्या त्यासाठी मागण्या करत होत्या.

या मंजूरीमुळे आता आयटी कंपन्यांच्या आवारात उघडलेल्या सध्याच्या रेस्टाॅरंटमध्ये (Restaurant) मद्यविक्री केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला परवाना घ्यावा लागेल. परवाना घेऊनच कंपन्यांच्या कॅम्पस मध्ये नवीन बार सुरु करता येणार आहे.

यापूर्वी नोएडामध्ये (Noida) संस्थात्मक मालमत्तेमध्ये रेस्टाॅरंट्स, स्पोर्टस क्लब आणि जिम उघडण्यास मान्यता होती, परंतु दारुचे परवाने दिले जात नव्हते. IT कंपन्याचा आवारात बार उघण्याचा निर्णय नोएडा प्राधिकरणाने 28 डिसेंबर रोजी झालेल्या बोर्ड बैठकीत घेतला.

IT पार्कमधील अनेक रेस्टाॅरंटनी बार उघडण्याची परवानगी मागितली होती. नोएडा प्रधिकरणाची परवानगी नसल्यामुळे परवाना दिला गेला नाही. आता मात्र रेस्टाॅरंटना परवाना दिला जाईल. अशी माहिती नोएडातील एका शुल्क अधिकाऱ्याने दिली आहे

महत्त्वाच्या बातम्या