योगींसाठी अंबानींनी उघडला खजिना, युपीला मिळणार गिफ्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

लखनऊ | ज्या प्रकारे भारत संपूर्ण जगासाठी आशेचा केंद्र बनला आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश भारतासाठी आशेचे केंद्र बनले आहे, असं वक्तव्य रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलं आहे.

यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’ला संबोधित करताना मुकेश अंबानी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

2023 मध्ये रिलायन्स समूह राज्यात 5G सेवा, किरकोळ आणि नवीन ऊर्जा व्यवसायासह दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

रिलायन्स समूहाचे टेलिकॉम युनिट जिओ डिसेंबर 2023 पर्यंत राज्यभरात 5G सेवा सुरू करेल. लखनौ येथील यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी म्हणाले की जिओ उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहर आणि गाव कव्हर करण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंत 5G चे रोल-आउट पूर्ण करेल.

दरम्यान, 5G सेवा सुरू करण्यासाठी, रिटेल आणि नवीन ऊर्जा व्यवसायासह दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी पुढील चार वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असं मुकेश अंबानींनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-