‘…अन् कार धडकली’, ऋषभ पंतनं सांगतिलं अपघात कसा झाला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा(India Cricket Team) स्टार खेळाडू ऋषभ पंत(Rishabh Pant) याच्या कारचा शुक्रवारी गंभीर अपघात(Car Accident) झाला आहे. रूरकीच्या नरसन सीमेजवळ हा अपघात झाला आहे.

सध्या पंतवर डेहराडूनमधील मॅक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला आणि कपाळाला जखम झाली आहे. तसेच त्याची प्लॅस्टीक सर्जरी करण्यात येणार आहे.

ऋषभनं आता त्याचा कार अपघात कसा घडला याची माहिती दिली आहे. पंत म्हणाला आहे की, मी स्वत: कार चालवत होतो, गाडी चालवत असतान अचानक मला झोप आली अन् कार रेलिंगला धडकली.

कार धडकल्यानंतर तो विंग स्क्रीन तोडून बाहेर आला, असं पंतनं सांगितलं आहे. यानंतर तेथील लोकांनी 108 नंबरवरती फोन करून पंतला रूग्णालयात दाखल करण्यात केलं आहे.

दरम्यान, जर पंत विंग स्क्रीन तोडून बाहेर येऊ शकला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती. पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच काही शुक्रवारी पंतसोबत घडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-