भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपने (Bjp) तयारी सुरू केली आहे.

भाजप 2024 मध्येही यश मिळेल आणि मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. मात्र भाजपसाठी ही निवडणूक इतकी सोप्पी नसेल असं आता दिसतंय.

भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनंही काम करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसशिवाय इतर पक्षांकडून देखील भाजपला कडवी टक्कर मिळणार आहे. 

भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि जागांमध्ये वाढ झाली आहे. 

लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्रेकडे काँग्रेसची चांगली रणनीती म्हणून पाहिलं जात आहे. भारत जोडो यात्रेने पक्षासाठी राजकीय वातावरण निर्माण केल्याचंही बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-