‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज

मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानचाही(Saif Ali Khan) मोठा चाहतावर्ग आहे. सैफ-करीनानं 2012 मध्ये लग्नगाठ बांधली आणि सध्या त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

परंतु लग्नापूर्वी करीनानं तब्बल ३ वेळा सैफचं प्रपोज नाकारलं होतं. तर झालं असं होतं की, त्याकाळात करीना आणि शाहरूखचं ब्रेकअप झालं होतं. त्यामुळं करीनानं करिअरवर फोकस करण्याचा निर्णय घेतला होता.

सैफ-करीनानं काही चित्रपटांत एकत्र काम केल्यानंतर त्यांना दोघांचा सहवास आवडू लागला होता. परंतु वयातील अंतर आणि करिअर लक्षात घेता सैफनं प्रपोज केल्यानंतरही करीनानं स्पष्ट नकार दिला होता.

सैफनं करीनाला चौथ्यांदा तिथं प्रपोज केलं होतं जिथं त्याच्या आईला म्हणजेच शर्मिला टागोरला त्याच्या वडिलांनी प्रपोज केलं होतं. त्यावेळी लव्ह सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात सैफनं करीनाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी मात्र करीना सैफला नाही म्हणू शकली नाही.

दरम्यान, सैफ-करीनानं पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले. आता सध्या त्यांच्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .