मुंबई | नुकतंच बिग बाॅस 16 चं (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले पार पडलं. या सीझनचा विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच आता पुन्हा स्टॅननं एक इतिहास रचला आहे. यामुळे सध्या त्याची प्रचंड चर्चा सुरु आहे.
स्पर्धा जिंकल्यानंतर स्टॅनची सगळीकडेच चर्चा सरु आहे. त्यांच्या संपत्ती, त्याच्या स्ट्रगल बद्दल सोशल मिडियावरदेखील प्रचंड बोललं जात आहे. स्टॅनच्या विजयामुळे प्रियंका चहल (Priyanka Chahal) आणि शिव ठाकरेच्या (Shiv Thackeray) चाहत्यांचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळत आहे. याचगोष्टीमुळं ट्विटरवर सध्या Undeserving Winner हा हॅशटॅग ट्रेंण्ड होत आहे.
दुसरीकडे विजेता स्टॅनला हा गोष्टीमुळं काहीच फरक पडला नसल्याचं दिसून येत आहे. स्टॅनचा चाहता वर्गदेखील भरपूर आहे. बिग बाॅस 16 ची ट्राॅफी जिकल्यानंतर स्टॅनने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर धडाधड पोस्ट आणि फोटो टाकायला सुरुवात केली.
त्यांनं पोस्ट टाकली आणि त्यानंतर त्या पोस्टवर स्टॅनच्या चाहत्याच्या लाईक्सचा प्रचंड पाऊस पडू लागला आहे. यामध्ये त्यांनं पूर्वीचे बिग बाॅस विनर सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि तेजस्वी यादवचा (Tejashwi Yadav) रेकार्ड मोडला आहे. फक्त तेजस्वी आणि सिद्धार्थ नव्हे तर याबाबतीत स्टॅननं विराट कोहलीचा देखील रेकाॅर्ड मोडला आहे.
सलमान खानसोबत(Salman Khan) एमसी स्टॅनच्या बिग बाॅस 16 च्या विजेत्या पोस्टला रेकाॅर्डब्रेक लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळं लोकप्रियतेच्या बाबतीत, स्टॅननं विराट कोहलीच्या अलीकडील पोस्टलादेखील मागं टाकलं आहे. विराट कोहलीच्या पोस्टला 2.7 लाख लाईक्स मिळालं आहेत तर दुसरीकडे स्टॅनच्या सलमानखानसोबतच्या पोस्टला 6.9 लाख लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वी कोणत्याही बिग बाॅस विजेत्याला इतक्या लाईक्स मिळाल्या नाही आहेत. स्टॅननं हा रेकाॅर्ड मोडला.
महत्त्वाच्या बातम्या