“व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होऊ शकतं”
मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना(Shivsena) यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात याबाबत बैठक झाली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या.
युतीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेवर आमचं लाईन मारण्याचं काम सुरु, व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होवू शकतं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आहे.
नाशिक विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार रतन बनसोडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबतच्या युतीवर भाष्य केलंय.
अजून आमची शिवसेनासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे काही शब्द देता येणार नाही. आमची फक्त शिवसेनेसोबत एकत्र येण्याची बोलणी सुरू आहे, उद्धव ठाकरे यांचे म्हणणं आहे की, आपण काँगेस आणि राष्ट्रवादीला देखील सोबत घेऊ, असं ते म्हणालेत.
दरम्यान, सध्या पक्ष बाजूला ठेऊन व्यक्तिगत राजकारण सुरू आहे. याला आळा बसला पाहिजे, आम्ही आता स्पर्धेत आहोत. यात काही जण पैसेवाले आहे. दहा दहा कोटी रुपये खर्च करू शकतात असं आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.