मुंबई | ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात असताना अभिनेता शिवने (Shiv Thakare) वीणा जगतापच्या नावाचा टॅटू काढला होता. पण काही दिवसांनी दोघांचं बिनसलं आणि दोघेही वेगळे झाले. मात्र ब्रेकअपनंतर देखील शीवच्या हातावर अजूनही तो टॅटू आहे. नुकताच त्याला हा टॅटू काढून टाकण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर शिवने उत्तर दिलं आहे.
टॅटूबद्दल बोलताना शिव ठाकरेने टॅटू काढणार नसल्याचं म्हटलंय. मी जे केलंय ते मला ठाऊक आहे. ती व्यक्ती योग्य होती याची मला माहिती आहे. आता आम्ही वेगळो झालोय पण त्या त्या वेळी ज्या गोष्टी घडल्या योग्य होत्या, असं शिवने म्हटलं आहे.
माझ्यासाठी तो व्यक्ती योग्य होता. त्यामुळे मला हे लपवण्याची किंवा काढून टाकण्याची काही गरज नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी येईल, ज्याला हे पाहून वाईट वाटेल, आवडणार नाही तेव्हा मी ते काढून टाकेन, असं त्याने सांगितलं आहे.
मला आता त्याची काहीच अडचण नाही. मला ते खुपत नाही आणि मला त्या व्यक्तीप्रती आदर आहे. मग मी ते का लपवू?, असं शिवने म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-