‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Swatantrya veer Savarkar | हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya veer Savarkar) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट काल म्हणजेच २२ मार्चला सर्वत्र भारतभर प्रदर्शित झाला आहे. मराठी आणि हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शानंतर पहिल्या दिवसाची चित्रपटाने केलेल्या कमाईचा आकडा समोर आला आहे.

या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा आहे. त्याने केलेल्या अभिनयाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील रणदीप हुड्डाने केलं आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाई केलेला आकडा पाहता चित्रपटाकडे प्रेक्षकांचा कल फारसा दिसत नाही. (Swatantrya veer Savarkar)

स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाची कमाई

पहिल्या दिवशी रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya veer Savarkar) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली दिसत नाही. प्रेक्षकांनी फरसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. 1.15 कोटी एवढी कमाई या चित्रपटाने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)


या चित्रपटाला स्पर्धा म्हणून इतर दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगीरी करताना दिसत आहेत.  ‘मडगाव एक्सप्रेस,’ आणि ‘ओम भीम बुश’ या चित्रपटांनी स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya veer Savarkar) यांच्या चित्रपटाहून अधिक कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांनी 1.50 कोटी व 1.25 कोटींची कमाई केली आहे.

महत्त्वाच्या भूमिकेत काम करणारे कलाकार

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. रणदीप हुड्डा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र त्या मानाने हा चित्रपट म्हणावा असं काम करू शकला नाही.

चित्रपटासाठी विकलं घर

स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर पंथ यांच्या जीवनावर भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी रणदीपने आर्थिक आणि सर्वच बाजूंनी मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने आपलं घर देखील विकलं असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Swatantra veer Savarkar First Day Income

महत्त्वाच्या बातम्या

“यातच आपली कुवत कळते, फुकटचे सल्ले…”, किरण मानेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

तब्बल 14 महिन्यांनी हा खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज! आज रंगणार PBKS vs DC

शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता

रहाणे आणि रचीनचा अफलातून झेल, विराट बघतच राहिला; व्हिडीओ व्हायरल

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना मोठा सल्ला; म्हणाले…