उर्फीच्या कपड्यावरून वाद आणखीच पेटला, अक्षरश: चित्रा वाघ-रूपाली चाकणकर एकमेकींना भिडल्या

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्फी जावेदच्या(Urfi Javed) कपड्यांवर भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतला होता. उर्फीला बेड्या ठोकल्या पाहीजेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. यावर उर्फीनं प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांना सुनावलं होतं. तेव्हापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत राज्य महिला आयोग उर्फीला समर्थन करत आहे का,असा सवाल करत महिला आयोगावर प्रश्न उपस्थित केला होता. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. कोणी काय घालवं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखाद्याचा पेहराव ठराविक व्यक्तींनाच अश्लील वाटत असतो, तो इतरांना वाटत नाही, त्यामुळं याबाबतीत आयोग वेळ वाया घालवू शकत नाही, असं चाकणकर म्हणाल्या होत्या.

आता चाकणकरांच्या या प्रतिक्रियेवर चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या आहेत की, महिला आयोगाची प्रतिक्रिया वाचली. महिला आयोगाचं काम काय आहे, महिलांचा सन्मान जपणे. पण महिला आयोग म्हणतयं वेळ वाया घालवायचा नाही.

महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथं बसण्याचा अधिकार काय आहे. वेबसिरीजच्या माध्यमातून अंगप्रदर्शन आणि धूम्रपानाचा संदेश जात असल्याचे सांगून तेजस्विनी पंडीत आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती, असं म्हणत त्यांनी उर्फी जावेदच्या प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.

सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) उर्फीचा विषय घेतला असता तर मला ही भूमिका घेण्याची वेळ आली नसती. हा विषय कधीच संपला असता, असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More