‘राजा वही बनेगा, जो…’; पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याने ठोकला शड्डू

पुणे | काही दिवसांपूर्वी भाजपचे(BJP) आमदार लक्ष्मण जगताप(Lakshman Jagtap) यांचं निधन झालं आहे. त्यामुळं चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना पक्षश्रेष्ठी संधी देऊ शकतात. जर आश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली तर ही पोटनिवडणूक बिनविरोधी होऊ शकते.

परंतु लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशाही चर्चा आहेत. जर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर मात्र ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.

हे सगळे पाहता या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे(NCP) माजी नगरसेवक नाना उर्फ विठ्ठल काटे(Vitthal Kate) तयारीला लागले आहेत. ते ही निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचं दिसत आहे. कारण त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि त्यांनी पोस्टरबाजीही सुरू केली आहे.

‘राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो काबिल होगा’, अशा आशयाची पोस्ट काटे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. त्यामुळं आता काटे ही निवडणूक लढवणार हे तर निश्तिच झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-