जालना | मराठा आरक्षणावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर शिंदे म्हणाले की “तुम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळेल फक्त सरकारला थोडा वेळ द्या.”
सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी कशासाठी वेळ पाहिजे? असा प्रश्न केला. जरांगे पाटलांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील हिने देखील आपलं मत मांडलं.
काय म्हणाली जरांगे पाटील यांची मुलगी?
माध्यमांशी बोलत असताना पल्लवी म्हणाली, या सरकारला कळायला नको का? मागच्या वेळी देखील 17 दिवस माझ्या वडिलांनी आमरण उपोषण केलं. तेव्हाही सरकारने आश्वासन दिले की मराठा समाजाला आरक्षण देऊ, आणि तेव्हाही सरकारने विश्वासघात केला. माझे वडील आज 8 दिवस झाले उपोषणाला बसले तर सरकारकडून नुसतं तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पुढे ती म्हणाली, की तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात शासनादेश काढला पाहिजे.
वंशावळी असलेला, कुणबी जातीची नोंद असलेला शासनादेश काढता मग तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासनादेश का काढत नाही?, असा प्रश्न देखील पल्लवीने सरकारला केला.
जर आता माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर मी त्यांची मुलगी म्हणून सांगते या राजकीय नेत्यांच्या घरात घुसून मी त्यांना हाणेन, असा इशारा तिने सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे जर आरक्षण दिलं नाही तर मी पुन्हा जलत्याग करेल, असं जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे आता सरकार पुढे कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा
‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण
मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली
पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती