PF धारकांसाठी मोठी अपडेट; झालेले ‘हे’ बदल जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नोकरदार वर्गासाठी भविष्याची तरतूद म्हणजे प्रोव्हिडंट फंड (PF) होय. यामुळेच रिटायरमेटनंतर तुमचं आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. खात्यात जमा झालेले हे पैसे तुम्ही नंतर काढू शकता. आता 1 एप्रिल 2023 पासून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात येणार आहेत.

आता तुमच्या खात्याला पॅन लिंक न झाल्यास तुम्ही पैसे काढायला गेल्यास 30 टक्क्याऐवजी 20 टक्के टीडीएस (TDS) आकारला जाईल. या नियमाचा फायदा पीएफ धारकांना होणार आहे. खातेदारकाने 5 वर्षाच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो.

2023 मध्ये टीडीएस साठी 10,000 रुपयांची किमान थ्रेडशोल्ट लिमिट (Threadsholt limit) काढून टाकण्यात आली आहे. लाॅटरी आणि पजल्स बाबतीत 10,000 रुपयांच्या मर्यादेचा निगम लागू राहील. एका आर्थिक वर्षात एकून 10 हजारांपर्यंतच्या अमाउंटवर टीडीएस कापला जाणार नाही.

दरम्यान, EPFO मध्ये एका व्यक्तीनं खाते उघडल्यानंतर 5 वर्षाच्या पैसे काढले तर त्याला TDS भरावा लागेल. तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली असेल तर 10 टक्के टीडीएस आकारला जाईल. पॅन नसल्यास 20 टक्के टीडीएस भरावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या