मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडलं!

जालना | उपोषणाच्या 17व्या दिवशी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना आश्वासन दिलं त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाचही मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. एका एका मागणीवर सविस्तर माहिती दिली. जरांगे पाटील यांनीही त्यांची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले. आल्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या-