५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही- अमित शहा

५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही- अमित शहा

मुंबई | ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही, असं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अल्पसंख्याकांना १२ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. यावर तेलंगणाच्या वरंगळ येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं. 

महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जात आहे. 

अमित शहा यांनी तेलंगणात ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही, असं सांगितलं. मग महाराष्ट्रात त्यांच्याच सरकारने मराठ्यांना कशाच्या आधारावर १६ टक्के आरक्षण दिलं?, असा सवाल आता विचारला जातोय.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?  

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

Google+ Linkedin