राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्यानं बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे तर काही ठिकाणी कमी थंडी जाणवत आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं काही राज्यांत सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळं दक्षिण पूर्व राज्यांमध्येही पुढील काही दिवस पाऊस पडू शकतो, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात(Department Of Meteorology) आला होता.

अशातच आता आता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी महाराष्ट्रातही पाऊस(Rain) पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. दक्षिणेतील चक्रिवादळामुळं महाराष्ट्रात रविवार ते बुधवारच्या दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज खुळे यांनी सांगितला आहे.

चक्रिवादळामुळं राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे या भागांत पावसाची शक्यता आहे. या नव्यानं तयार झालेल्या चक्रिवादळाचा महाराष्ट्रात प्रत्यक्षात परिणाम 12 ते 15 डिसेंबरदरम्यान दिसू शकतो.

डिसेंबर महिन्यात पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचही नुकसान होऊ शकतं. त्यामुळं बळीराजा चिंतेत आला आहे.

दरम्यान, गुरूवारी किमान तापमानात घसरण झाली होती. त्यामुळं राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडली होती.

महत्वाच्या बातम्या-