मल्ल्याला अटक करण्यासाठी सीबीआयची टीम लंडनमध्ये दाखल

लंडन | भारतीय बँकांचं कोट्यवधींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी सीबीआयची टीम लंडनमध्ये दाखल झालीय. सीबीआयचे उपसंचालक राकेश आस्थाना स्वतः या टीमचं नेतृत्लव करत आहेत. तसेच त्यांच्यासोबत अंमलबजावणी संचालनालयाचे काही अधिकारीही आहेत.

दरम्यान, भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या लंडनला फरार झाला होता. तेथे त्याला अटक होऊन जामीनावर मुक्तताही झाली. सध्या हे प्रकरण तिथल्या न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या