नवी दिल्ली | एखाद्या व्यक्तीबदद्ल आपल्याला आर्कषण वाटणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल (male) आणि पुरुषाला एका स्त्री बद्दल नेहमीच आकर्षण असतं. आकर्षण अनेकदा एका नात्यात रुपांतरित होतं. हे नात मात्र आपण केव्हा करतो यालादेखील काही गोष्टीची मर्यादा आहे.
अनेकदा लग्न झाल्यानंतरदेखील किंवा एखाद्या नात्यात असतानादेखील पुरुषांना दुसरी स्त्री (woman) आवडते. भारतीय संस्कृतीमध्ये मात्र विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) चुकीचे समजले जातात. तरीदेखील पुरुष दुसऱ्या स्त्रियांकडं आकर्षित होतात. चाणक्यांनी याची महत्त्वाची 5 कारणं सांगितली आहेत.
लहान वयात लग्न होणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. तरुण वयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत (Career) गंभीर असतो, या वयात संसाराची समजदेखील कमी असते. अशावेळी व्यक्ती आपल्या करिअरकडं लक्ष देतो बाकी कशाचंही लक्ष त्याला लागत नाही. कालांतराने जेव्हा स्थैर्य येते तेव्हा माणूस आपल्या इच्छाकडं लक्ष देतो. अशावेळी विवाहबाह्य संबधाचा धोका वाढतो.
अनेकदा पती-पत्नीच्या नात्यात चांगले शरीरसंबंध (body relations) नसतात यामुळे एकमेकांविषयी आर्कषण कमी व्हायला लागतं. हे देखील विवाहबाह्य संबंधाचं एक कारण आहे. उगाच विनाकारण आपल्या जोडीदारांवर वारंवार संशय घेतल्यानं देखील पुरुष विवाहबाह्य संबंधाचा विचार करतात.
वैवाहिक जीवनात अनेक वेळा जोडीदाराचं मन अस्वस्थ (restless) होऊ लागतं. अशावेळी दुसरी स्त्री आवडायला लागते. आई-वडील होईपर्यंत वैवाहिक जीवनात (In married life) थोडं प्रेम जास्त असतं. असं अनेकदा दिसून येतं की बाळाच्या जन्मानंतर पती आपल्या पत्नीपासून दूर जातो. पत्नीचं सगळं प्रेम बाळाला मिळत असल्यामुळं पुरुष ते प्रेम दुसऱ्या स्त्रिमध्ये शोधतो. या कारणांमुळे पुरुष दुसऱ्या स्त्रियांकडं आकर्षित होतात.
महत्त्वाच्या बातम्या