Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

नवी दिल्ली | आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं (Supriya Sule) लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहेे. त्यांच्यासह 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना देखील निलंबन करण्यात आलंय. यानंतर सुप्रिया सुळे यांनी निलंबनानंतर प्रतिक्रिया दिली. आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. विरोधकांना हद्दपार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं? 

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे.

आज 41 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा!

Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली मोठी घोषणा!

Dawood Ibrahim | पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड?; दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट!

MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका