तरूणांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने (State Goverment) शासनाच्या विविध विभागात भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा दोन वर्ष वाढवून दिल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा आता 38 एवजी 40 वर्ष होईल आणि मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 ऐवजी 45 वर्षे होणार आहे. ही वयोमर्यादेतील सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील असं, शासन निर्णयात म्हटलं आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आज जारी केलं आहे. वयोमर्यादेतील ही सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात 75000 नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. त्या नोकरभरतीच्या प्रक्रियेत हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-