‘…तेव्हा सगळ्यांना मोठा शॉक बसेल’; एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेतील भाषणात बोलताना पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना शिंदेंनी विरोधकांना जोरदार टोले लगावले आहेत.

पहाटेच्या शपथविधीवेळी तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मला वाटलं हे मागचं आहे. कुणीतरी बोललं हे मागचं नाही आत्ताचं आहे. मी जयंतरावांना फोन करत होतो. ते उचलत नव्हते. ते बोलले जयंतरावही तिथेच होते. तो माझ्यसाठी मोठा शॉक होता, असं सांगत एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना (Jayant Patil) टोला लगावला.

आता सुरसकथा हळूहळू बाहेर येत आहेत. त्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजून स्पष्ट केल्या नाहीत. त्यांनीही अर्धच सांगितलं. ते जेव्हा पूर्ण सांगतील तेव्हा सगळ्यांना शॉक बसेल, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

दरम्यान, सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतं, असा आरोप केला जातो. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना घेरलं. ते म्हणाले, दादा तुम्ही बोलतात गोड. पण तुमचा कार्यक्रम सुरु असतो. त्यामुळे असे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील. आम्ही त्यासाठी जालीम औषध ठेवलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबा ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-