कसला अफलातून कॅच!!! श्रीलंकन खेळाडूचा कायरन पोलार्डने घेतला खतरनाक कॅच, पाहा व्हिडिओ
वेस्ट इंडिज | काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी करत, श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता श्रीलंका विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पोलार्डने श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचा अविश्वसनीय झेल घेतला आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचे सिद्ध केले आहे. त्याने घेतलेल्या एका झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. यात वेस्ट इंडिज संघाकडून कायरन पोलार्ड कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे.
श्रीलंकन संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने फलंदाजी करत असताना षटक फेकण्यासाठी पोलार्ड गोलंदाजीला आला होता. त्याने ओवर द विकेटचा मारा करत चेंडू गूड लेंथच्या दिशेने टाकला. त्या चेंडूवर फलंदाजाने सरळ शॉट खेळला आणि पोलार्डने उजव्या बाजूला डाईव मारत एका हाताने अफलातून झेल घेतला आहे.
दरम्यान, भारताचा धुरंदर आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं 2007 मध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात एकाच षटकात 6 षटकार मारून इतिहास रचला होता. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ड ब्राॅडच्या एका षटकात 6 षटकार ठोकत त्यानं हा कारनामा केला होता. आता वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने युवराजचा हा रेकाॅर्ड मोडीत काढला आहे. त्याने श्रीलंकाविरूद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा इतिहास रचला होता.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या -.
‘या’ कारणानमुळे तृणमूल काँग्रेसला बसू शकतो मोठा फटका!
विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा ‘पृथ्वी’ वादळाचा तडाखा; गोलंदाज हतबल होऊन पाहातच राहिले!
सेक्स न करताच तरुणी प्रेग्नंट झाल्यानं खळबळ, डॉक्टरही झालेत हैराण
आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हावी; ‘या’ खेळाडूच्या मागणीनं खळबळ
मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ
Comments are closed.