बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. सरकारच्या या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने लगेचच टीका केली आहे. या अर्थसंकल्पामधील अनेक योजना भाजपच्या काळातील आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे “घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ” आणि शब्दांचे बुडबुडे तसेच “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असं मी म्हणेन! कारण कोकण, विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

कोकण, विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय करणारा अर्थसंकल्प! कारण कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची आमची मागणी होती, ती पूर्ण झाली नाही. तसेच मराठवाडा-विदर्भाचा या ठिकाणी विचार केला आहे की नाही?, असा प्रश्न पडतो सरकारला उद्याच्या चर्चेत याची उत्तरे द्यावी लागतील, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाने केेलेल्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार तापले आणि पवारांनी विरोधकांना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाही. 2009 ते 14 पर्यंत मी 4 अर्थसंकल्प मांडले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनीही मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नसल्याचं अजित पवार म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘भाजपची मक्तेदारी आहे का?, अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही’; अजित पवार आक्रमक

‘हे महाराष्ट्राच बजेट की मुंबई महापालिकेचं’; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

अखेर अमृता फडणवीसांच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More