बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात’; आठवलेंनी घेतली कंगणा राणावतची भेट

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेमधील वाद आता कुठ शांत झाल्यासारखं वाटत आहे. कंगणाची सकाळीही ट्विटची मालिका चालू होती सेनेकडून कोणतंही प्रत्युत्तर आलं नाही. मात्र अशातच रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगणा राणावतची भेट घेतली आहे.

मी कोर्टमध्ये जाणार आहे. मला महापालिकेकडून भरपाई मिळायला हवी. माझं फर्निचर, वॉल तोडली आहे. कंगणाने मला या गोष्टी सांगितल्या. माझी कंगणासोबत खूप विषयावर चर्चा झाली. कंगणाला उगाच त्रास झाला असल्याचं आठलेंनी म्हटलं आहे. त्यासोबतच माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात, तुमचा आशिर्वाद असू द्या, असं कंगणा भेटीदरम्यान आठवलेंना म्हणाली.

मुंबई ही सर्व पक्षांची आणि सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगणाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. तसेच याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांशीही चर्चा करणार असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, कंगणाच्या राहत्या घरी खार इथे त्यांनी भेट घेतली.  कंगणा आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा सुरु होती.

 

महत्वाच्या बातम्या-

परेश रावल यांना मोदी सरकारकडून मिळालं गिफ्ट; सोपवली ही मोठी जबाबदारी

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, आपल्या बहिणीची ताकद कमी होऊ देऊ नका नाहीतर…- बबिता फोगट

मुंबई कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही- रामदास आठवले

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील अयशस्वी मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं”

‘संभाजी बिडी’चं नाव बदलणार; संभाजी ब्रिगेडच्या लढ्याला यश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More