मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनानांनी आज भारत बंदची हाक दिला आहे. याच पार्श्वभमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देशांतील जनताही जाणून आहे, की हा तर शेतकरी विरोधी बंद आहे. शेतकऱ्याला योग्य भाव मिळू नये यासाठी आजचा बंद असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
शेतकरी दलाल आडत्यांच्या जोखडात रहावा यासाठी आजचा बंद. पण आता शेतकरी फसणार नसल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी #farmerwithmodi वापरला आहे.
दरम्यान, सकाळी 8 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असं आवाहन शेतकरी संघटनांनी केलं आहे.
देशांतील जनताही जाणून आहे, की हा तर शेतकरी विरोधी बंद आहे. ▪️शेतकऱ्याला योग्य भाव मिळू नये यासाठी आजचा बंद
▪️शेतकरी दलाल आडत्यांच्या जोखडात रहावा यासाठी आजचा बंद
▪️शेतकऱ्यांचा नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद आहे
पण आता शेतकरी फसणार नाही #farmerwithmodi— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 8, 2020
थोडक्यात बातम्या-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमीच- राजेश टोपे
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबावर ओढावलं आणखी एक संकट
“शेतकऱ्यांनी तुुम्हाला विश्वासाने परत सत्ता दिली मात्र बळीराजाच्या विश्वासाला केंद्राने तडा दिला”
पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!