बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नाही त्यामुळे….’; राहुल गांधींना फडणवीसांंचा चिमटा

मुंबई | काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या इंधनांच्या दरांविरोधात मुंबईत काँग्रेस नेत्यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता. मात्र बैलगाडीवर प्रचंड वजन वाढल्याने ती कोसळली आणि बैलगाडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस नेते जमिनीवर कोसळले. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला कोपरखळी मारली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना देखील आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींना टोला हाणला आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेवरही भाष्य केलं. पंकजा मुंडे नाराज नाहीत. यावर आम्ही दोघांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे इतरांना जी काही पतंगबाजी करायची आहे. ती करू द्या, असं फडणवीस म्हणाले.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष व्हावे पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मोठी बातमी! प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने भाजपच्या 14 नाराज पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

“तुमच्या विश्वगुरु बनण्याच्या मोहापायी जनता फकीर बनत चाललीय”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यातील धबधबे व इतर पर्यटनस्थळी जाण्यास बंदी!

‘…नाहीतर आधीच्या गृहमंत्र्यांसारखी आपली परिस्थिती होऊ शकते’; ‘या’ भाजप आमदाराचा दिलीप वळसे-पाटलांना इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More