मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक झालेल्या सचिन वाझेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई | राज्यभर चर्चेत असलेल्या मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं असून त्यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. तर सचिन वाझे यांची गाडीत स्फोटकं ठेवल्या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी होत आहे. या सुनावणीवेळी सचिन वाझेंनी या प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं असल्याचं म्हटलं आहे.
मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत, आम्ही तुला अटक करतो, असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तर जी चौकशी करायची होती ती करून झाली आहे आता आणखीन एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेंनी सुनावणीवेळी एनआयए न्यायालयात केली आहे.
मला कोर्टाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत, असं सचिन वाझे म्हणाले. यावर मात्र जे काही सांगायचं असेल ते लेखी स्वरूपात द्या, असे निर्देश एनआयए न्यायालयाने दिले. यावेळी बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद, धमकावण्याचा हेतू नव्हता तर मग गाडी काय समारंभासाठी अंबानींच्या घराबाहेर लावली होती का, असं एनआयएनं म्हटलं आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणी करण्यात आली.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का- नाना पटोले
मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ
मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ
रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.