मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकाराने देशात लॉकडाऊन केलं आहे. जनतेला विनाकारण घरातून बाहेर पडू नका असं वारंवार आवाहन करूनही काही लोक सूचनांचं पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. अशातच गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल आणि जनतेला केलेलं ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
क्वारंटाईन लोकं बाहेर फिरताना दिसले, तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका, अशीही मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. डोंबिवलीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आमदार पाटील यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 153 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.
महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा.#coronavirus @CMOMaharashtra @rajeshtope11
— Raju Patil (@rajupatilmanase) March 20, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
“दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करा “
महत्वाच्या बातम्या-
भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश; पाहा सूक्ष्मदर्शकाखाली कोरोना कसा दिसतो
लोक अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करतायेत हे सगळं बघून मला धक्काच बसला- उद्धव ठाकरे
शिकला तितकाच हुकलेला! क्वारंटाईन असतानाही IAS केरळवरुन कानपूरला पळाला
Comments are closed.