बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ये नया पंजाब है! पंजाबने विराटच्या बंगळुरूचा केला पराभव

मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्समधील सामन्यात पंजाबने 34 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने राहुलच्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूला 180 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र पंजाबचा युवा गोलंदाज हरप्रीत ब्रारने केलेल्या सुरेख गोलंदाजीमुळे बंगळुरूला 20 षटकात 145 धावात रोखलं.

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरूवात ठीकठाक झाली. जखमी मयंकच्या जागी संधी मिळालेल्या प्रभसिमरन आपली छाप उमटता आली नाही. राहुल आणि ख्रिस गेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली. आक्रमक खेळी करणारा ख्रिस गेल 46 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज जास्त वेस खेळू शकला नाही. मात्र कर्णधार राहुलने एक बाजु लावून धरली होती. राहुलने नाबाद 91 धावांची खेळी केली.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरूचीही सुरूवात मात्र काही खास अशी झाली नाही. सलामीवीर देवदत्त पड्डीकल लवकर बाद झाला. त्यानंतर विराट लयीत आल्यासारखा वाटत होता. मात्र पंजाबच्या हरप्रीत ब्रारने एका षटकात सामना काहीसा झुकवला, त्या लागोपाठ विराट कोहली आणि मॅक्लवेलला बाद  केलं. त्यानंतर पुढच्या षटकात खतरनाक एबी डिव्हीलीअर्सलाही बाद केलं.

दरम्यान, अखेर बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने मनोरंजक फटकेबाजी केली. मात्र हा सामना पंजाब जिंकेल असं वाटत नव्हतं. कारण विराट खेळपट्टीवर स्थिरावला होता. मात्र हरप्रीत ब्रारने महत्त्वाच्या तीन गड्यांना तंबुचा मार्ग दाखवत सामना पंजाबच्या बाजुने पुर्णपणे झुकवला.

थोडक्यात बातम्या- 

मास्कसंदर्भात नव्या सूचना, प्रत्येकाला ‘या’ सूचना माहितच असायला हव्यात!

“केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असतं का?”

हाही काळ निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल- उद्धव ठाकरे

“नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे थांबवावं”

कोरोना व्हायरसची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजन कमी पडणार नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More