Top News अमरावती कोरोना महाराष्ट्र

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर

Photo Credit - Twitter/ @AdvYashomatiINC

अमरावती | अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांत कमालीची वाढ दिसून येत आहे. शहरात कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री व अमरावती शहराच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मो़ठी घोषणा केली आहे. उद्यापासून अमरावती आणि अचलपूर येथे लाॅकडाऊन लावण्यात आला आहे.

राज्यात अनलाॅकनंतर हा पहिलाच लाॅकडाऊन असणार आहे. सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यु दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लाॅकडाऊन करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील, असं देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकेने शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तर या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, पुण्यातही कोरोना रुग्णाची संख्या पाहाता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आजपासून तर 28 तारखेपर्यंत शहरात नाईट कर्फ्यू लागू केला आहे. पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय देखील 28 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहे.

थोडक्यात बातम्या –

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या