बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आता राजकीय कार्यक्रमात आणि आंदोलनात उपस्थित राहताना दिसत आहेत. मध्यंतरी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हजारो शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 14 दिवस आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी या आंदोलनक शिक्षकांना आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आता काका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पूर्ण केलं आहे.

हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावर आक्रमकपणे 14 दिवस आंदोलन केलं होतं. त्यात त्यांनी वाढीव वेतन अनुदानाच्या मुद्यासकट अनेक मागण्या लावून धरल्या होत्या. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर लगेच अमित ठाकरेंनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची भेट घेतली होती.

मागण्या पूर्ण होईपर्यंत मनसे तुमच्या सोबत असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली होती. त्यानंतर त्यांनी लगेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे सरकराने जीआर वितरीत करत 140 कोटींच्या निधीची घोषणा केली. या निधीमुळे राज्यातील 33 हजार शिक्षकांना लाभ होणार आहे.

दरम्यान, अमित ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला आहे. 33 हजार 154 शिक्षकांच्या वेतन वाढीचा विषय मार्गी लागला आहे. तर शिक्षकांच्या 20% अनुदानाचा विषय मार्गी लागला आहे, असं ट्विट मनसेने केलं आहे.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या-

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

कौतुकास्पद! दोन अक्षराच्या पत्यावरुन पोलिसांनी अडीच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More