Top News महाराष्ट्र मुंबई

भाजप नेते आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं कौतूक

मुंबई | भाजपची आणि शिवसेनेची युती तुटल्यापासून भाजप नेत्यांमध्ये आणि शिवसेना नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी होत आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजप नेते टीका करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र अशातच भाजप नेते आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपूत्र तेजस ठाकरे यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

उर्जावान तेजस ठाकरेंचे नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन ! करोनकाळात देखील ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पढली, हे कौतुकास्पद ! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा!, असं आशिष शेलारांनी केला आहे.

तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगांत केलेल्या संशोधनानंतर आता मेघालयातही महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. मेघालयातील खासी टेकड्यातून तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ हा मासा शोधला आहे.

दरम्यान, चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचं तेजस ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून आव्हाड म्हणत आहेत की ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा

रात्री लवकर न झोपल्याचे परिणाम; अंपायरने भर मैदानात केलं असं काही की….; पाहा व्हिडीओ

ईडीवरून सीडी लावण्याच्या खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपला धक्का! एनडीएतून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या