Top News देश

“माझ्याकडे सगळी माहिती, पण…”;किम जोंग यांच्या प्रकृतीवर ट्रम्प यांचा खुलासा

नवी दिल्ली | उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल सध्या अनेक शक्यता व्यक्त केल्या जात असून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल योग्य माहिती असल्याचं म्हटलं आहे.  सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

किम जोंग यांची प्रकृती चांगली असावी अशी अपेक्षा आहे. पण खरं सांगायचं तर ते कसे आहेत याची मला कल्पना आहे. लवकरच तुम्हालाही याची माहिती मिळेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

माझे किम जोंग यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मी जर राष्ट्राध्यक्ष नसतो तर आज तुम्ही उत्तर कोरियासोबत युद्ध लढत असता. हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो. त्यांना युद्धाची अपेक्षा होती, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार किम जोंग यांची हार्ट सर्जरी झाली असून तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली असल्याचा दावा केला आहे. मात्र याबाबत उत्तर कोरियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे दक्षिण कोरियाने किम जोंग जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या