Top News देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक

नवी दिल्ली | आता देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

1 जानेवारी 2021 पासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग असणं बंधनकारक असणार आहे. फास्टटॅगच्या या सक्तीमुळे वाहनांना रोख टोल भरावा लागणार नसल्याचं गडकरींनी सांगितलं आहे.

फास्टटॅग असल्याने आता वाहनांचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही वाचणार असल्याचंही गडकरी म्हणाले. त्यामुळे आता सुट्टी दिवशी फिरायला गेल्यावर टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रागांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

दरम्यान, फास्टटॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा झाल्यावर त्या धारकाला संदेश मिळणार आहे. अकाऊंटला तुम्हाला रिचार्ज करावं लागणार असून एका फास्टटॅगच्या अकाऊंटचा कालावधी पाच वर्षाचा असणार आहे. पाच वर्षानंतर तुम्हाला नवीन फास्टटॅग विकत घ्यावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्तासुंदरी हातची गेल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदाससारखी”

“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट”

राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडीओ

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या