बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने केलं असं काही की…

लखनऊ | जोडीदार आपला वाढदिवस विसरला की स्त्रियांना प्रचंड राग येतो. तसेच कामाच्या आणि बाकीच्या गोष्टींमुळे अनेक वेळा पती त्याच्या पत्नीचा वाढदिवस विसरतोच. मात्र लखनऊ येथील एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. वाढदिवस विसरण्यावरून एका दाम्पत्यामध्ये मोठा वाद पेटला आहे. संबंधित पती त्याच्या पत्नीचा वाढदिवस विसरला. त्यानंतर पत्नीने जो निर्णय घेतला त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दाम्पत्य हे उच्चशिक्षीत हे. संबंधित पत्नी ही पी.एच.डी करते तर पती काॅलेजमध्ये लेखपाल आहे. दोघांमधला वाद विकोपाला गेल्यानंतर हा वाद केंद्राकडे नेण्यात आला. यावेळी आपला पती त्याच्या आई-वडिलांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही. याचसोबत अनेक कारणांवरुन सतत वाद होत असल्याचं समोर आलं. पत्नीने यादरम्यान गेल्या तीन वर्षांपासूनच्या सर्व तक्रारी सांगितल्या आहेत.

सततच्या वादांमुळे आणि कामाच्या गडबडीत पती वाढदिवस विसरला म्हणून पत्नीने आता पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. तसेच पत्नीने घटस्पोटाची देखील मागणी केली आहे. परिवारातील सदस्यांनी लाख समजवून देखील पत्नी तिच्या निर्णयावर ठाम आहे. एवढंच नाही तर पतीने पत्नीसमोर हात जोडून यासाठी माफी मागितली आहे.

दरम्यान, पतीने माफी मागून घटस्पोट न देण्यास विनवणी केली. मात्र पत्नीने आपला हट्ट आद्याप सोडला नाही. तसेच त्यांच्यातील वाद देखील मिटला नसून त्यांचे काऊंन्सलिंग करण्यात येत आहे. तसेच त्यांना आता काऊन्सलिंगसाठी दुसरी तारीख देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल

धक्कादायक! पुरुषांपेक्षा जास्त ‘या’ स्त्रियांना पाॅर्न पाहण्यात अधिक रस, अभ्यासातून झाला ‘हा’ खुलासा

ऑलिम्पिकमध्ये रंगणार भारत पाकिस्तान सामना; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर भारताची धूरा

पोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र या योजनेतुन दाम दुप्पट करण्याची सुवर्णसंधी

राज कुंद्रा प्रकरणात आता ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More