बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

कल्याण सिंह यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना सुरवातीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची आरोग्य स्थिती आणखी खालावत चालली होती. त्यामुळे कल्याण सिंह यांना नंतर लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

कल्याण सिंह यांची प्रकृती खालावली होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत प्रकृतीबाबत विचारणा केली होती. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर मोदींनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचा हात होता. त्यासोबतच ते करोडो शेतकरी, युवा आणि सामान्य वर्गाचा आवाज होते. त्यांचा मुलगा राजवरी सिंह यांच्याशी बोलणं झाल्याचं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मी जास्तच रोमॅन्टिक, मला 3-4 मुलांची आई व्हायचंय’; या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची इच्छा!

मोठी बातमी! संजय राठोडांना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात मिळाली क्लिन चीट

बैलगाडा शर्यतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More