बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

मुंबई | पाॅर्नोग्राफी केसमध्ये अडकलेल्या राज कुंद्रासोबत गहना वशिष्ठने देखील हाॅटशाॅट अॅपसाठी काम केलं आहे. एका माॅडेलने राज कुंद्रा विरोधात तक्रार केल्यानंतर यामध्ये गहनाचं देखील नाव समोर आलं आहे. त्यानंतर गहनाने अटकेपुर्वीच आपली जामीन करण्यात यावी अशी याचिका कोर्टात केली होती. मात्र गहनाला याबाबत दिलासा मिळाला नाही.

गहनाने राज कुंद्राच्या हाॅटशाॅट अॅपसाठी काम केलं आहे आणि ही गोष्ट तिने देखील स्वीकारली असून आपण केलेलं काम हे पाॅर्न व्हिडीओमध्ये येत नाही, असं तिने म्हटलं आहे.

एका माॅडेलने राज कुंद्रा आणि राजच्या कंपनीतील चार निर्मात्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यामध्ये गहनाचं देखील नाव आहे. यावर ज्या माॅडेलने आपल्यावर आरोप केला आहे ती स्वतः अडल्ट कंटेंट बनवते आणि तिचे ते व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर देखील आहेत, असं गहनाने म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्यावर नको ते आरोप करुन आपल्याला अडकवण्यात येत आहे, असं गहनाचं म्हणणं आहे. काही दिवसांपुर्वीच गहनाने मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप केले होते. तर अलीकडेच गहनाने न्यूड लाईव्ह सेशन घेऊन हा कंटेंट पाॅर्न नाही अगदी तसाच जसा राजच्या अॅपसाठी केलेला व्हिडीओ, असा दावा गहनाने केलाय.

थोडक्यात बातम्या-

यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री

कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण

वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…- प्रविण दरेकर

‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More