‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक
मुंबई | राज्यात कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. तशाप्रकारे जिल्हा प्रशासनाने आदेश देऊनही कोरोना फोफावताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
नागरिक नियमांचं काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे जर असंच सुरू झालं तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य एएनआयने ट्विट केलं होतं. हरभजनने या ट्विटला रिप्लाय केला आहे.
लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही, असं म्हणत हरभजन सिंगने आपला संताप व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्याने रागाचा इमोजीही वापरला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या निर्बंधाबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणं नागिरांकाना अनिवार्य असणार आहे, पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
Do the lockdown as people are not gonna listen.. don’t know when we will understand and how.. 😡 https://t.co/DjiQjOGeKX
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 29, 2021
थोडक्यात बातम्या-
‘उद्धवजी, समस्या ही आहे की…’; लॉकडाऊनवरून आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
जाणुन घ्या… महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या
महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पेट्रोलपंप, हॉटेलसाठी नवीन नियमावली
राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.