बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही’; पाटलांच्या टीकेवर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मुश्रीफांनी पत्रकार परिषेद घेऊन आरोप फेटाळले आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर आरोप केले. त्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, असा इशारा दिला होता. यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर देत फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू असं म्हटलं आहे.

भाजप लोकांची दिशाभूल करत असून लोकांची समस्या सोडवत नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याला गांभिर्याने घेत नाही. तसेच आमच्या मंत्र्यांची चूक नसल्यानं आम्हाला घाबरायची गरज नाही, असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. यावेळी कॅबिनेटमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा होऊन देवेंद्र फडणवीसांच्या काळातील अनेक फाईल्स तयार आहेत, त्या बाहेर काढल्या पाहिजे, असा टोला देखील पटोलेंनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

सांगा पाहू दबंग कोण?; अमोल मिटकरींनी मांडलं आघाडीचं गणित

पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More