बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरींच्या वाढदिवसादिवशी घरी लक्ष्मीचं आगमन, गडकरी झाले आजोबा

मुंबई | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांच्या घरी नातीचं आगमन झालं आहे.

नितीन गडकरी यांचे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न प्राप्त झाली आहे. नितीन गडकरींच्याच वाढदिवसादिवशी लाडक्या नातीच्या आगमनाने घरात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. नितीन गडकरींना औक्षण करण्यात आलं तेव्हा त्यांची लाडकी नात त्यांच्या मांडीवर होती.

औक्षण झाल्यावर घरातील लहान मुलांनी आपल्या हातानी तयार केलेला ग्रिटींग कार्ड आपल्या लाडक्या आबांना दिले. गडकरींनी हे ग्रिटींग कार्ड उघडून पाहिले आणि त्यानंतर आनंदाचा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.

दरम्यान, दरम्यान, ब्लॅक फंगसवरील  उपचारासाठी वापरल्या जाणारे इंजेक्शन 7000 रुपयात मिळणारं मिळत होते. पण आता ते अवघ्या 1200 रुपयात उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन लॉन्च केलं आहे. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचं उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करीत होती. मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्सदेखील हे इंजेक्शन तयार करणार आहे. जेनटेक लाइफ सायन्सची दररोज तब्बल 20,000 वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघात, तासभर चालक गाडीत अडकून, पाहा व्हिडीओ

पुण्यात थरार! एकतर्फी प्रेमातून युवकाने केला गोळीबार

‘किस काॅन्ट्रोव्हर्सी’ला विसरुन राखी सावंत आणि मिकानं घेतली गळाभेट, म्हणाले…., पाहा व्हिडीओ

चक्क एका कोंबडीने मगरीला कसा दिला चकवा, पाहा मजेशिर व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More